केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबिन हे भागीदार असलेल्या कंपनीच्या नावावर आसगाव बार्देश येथील सिली सोलचा परवाना असल्याचे आरटीआय माहितीमध्ये उघड झाल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ऍड. रॉड्रिगीस यांना दिलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. या माहितीमुळे सिली सोल्सचा केंद्रीय मंत्री इराणी यांच्या पतीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आसगाव येथील सिली सोल्स बारचा विषय मद्यविक्री परवान्याच्या प्रश्नावर गाजत आहे. येथील अबकारी आयुक्तांकडे या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.