सांगे कार अपघातातील तिसरा मृतदेहही सापडला

0
5

तारीपांटो-सांगे येथील पुलावरून सोमवारी रात्री कार थेट नदीत कोसळल्याने पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी रेखा यादव नाईक आणि दिव्यांश नाईक या माय-लेकाचा मृतदेह सोमवारीच हाती लागला होता. मात्र पती मिलिंद नाईक हे बेपत्ता होते. मंगळवारी सकाळी दोन तासांच्या शोधकार्यानंतर मिलिंद नाईक यांचाही मृतदेहही हाती लागला.

सविस्तर माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास तारीपांटो-सांगे येथील पुलाच्या धडक देत एक कार नदीत कोसळली. कार नदीत कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला माहिती दिली. दलाच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नदीतून कारसह रेखा यादव नाईक (32) आणि दिव्यांश नाईक (2) यांचे मृतदेह बाहेर काढले; मात्र कारचालक मिलिंद नाईक यांचा शोध लागू शकला नव्हता. काल शोधमोहिमेनंतर त्यांचाही मृतदेह सापडला.