सर्वोच्च न्यायालयाचा आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार

0
15

>> महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का

शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण ठाकरे गटाकडून शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र याचवेळी न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिला आहे. तसेच, ठाकरे गट, शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाच्या याचिकेवर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.

यावेळी ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणीस न्यायालयाने होकार दिला आहे. न्यायालयाने दोन्ही गटांना नोटीस बजावलीअसून 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. 2 आठवडे ठाकरे गटासाठी व्हीप जारी न करण्याचे आदेशही ठाकरे गटाला देण्यात आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी 1 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर लगेच ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर काल यावर सुनवणी झाली.