सभेला जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात

0
5

अमित शहा यांच्या फर्मागुडी येथील जाहीर सभेला हजर राहण्यासाठी गेलेल्या काही काँग्रेस नेत्यांना काल ताब्यात घेण्यात आले. त्यात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस प्रदीप नाईक, श्रीनिवास खलप, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, नितीन चोपडेकर यांच्यासह एकूण 10 जणांचा समावेश होता. या सर्व जणांना ताब्यात घेऊन कुळे पोलीस स्थानकात नेण्यात आले. भाजपच्या या कृतीचा काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही भाजपची हुकुमशाही असल्याचा आरोप गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. दरम्यान, काही काँग्रेस नेत्यांनी पोलिसांना गुंगारा देत फोंडा बसस्थानकावर काळे झेंडे दाखवत म्हादईप्रश्नी अमित शहा यांनी गोव्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर केली.