सख्ख्या भावाकडून बहिणीवर बलात्कार

0
20

सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले गावात घडली. या प्रकरणी पीडित बहिणीच्या तक्रारीनंतर वाळपई पोलिसांनी नराधम भावाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्तरीतील पिसुर्ले गावात सदर पीडित मुलगी, तिचा भाऊ आणि आई असा परिवार राहते. नराधम भाऊ २४ वर्षांचा असून, पीडित बहीण ही १९ वर्षांची आहे.

सदर पीडितेने लैंगिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. भावाने आपल्यावर तीन वेळा बलात्कार केल्याचे पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सदर पीडितेची तक्रार नोंद करून तिच्या भावास अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, कलम ३५२ ब व ३७६ ब यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.