सक्रिय रुग्णसंख्या हजाराच्या जवळ

0
9

राज्यात मागील चोवीस तासात नवीन १२० कोरोनाबाधित आढळून आले असून, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९४६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १३.२८ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत आणखी ८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०६ टक्के एवढे आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३९५५ एवढी आहे.