संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

0
10

काल रविवारी सुमारे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ताब्यात घेतले. काल सकाळी ७ वाजल्यापासून ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी सुरू केली होती. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी राऊतांच्या घराबाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले.

शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीनं सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला. संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या रकेमाच हिशेब लागला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, एका ऑडिओ क्लिपवरून संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.