वीजबिलाच्या नावाखाली 1.04 लाखांचा गंडा

0
16

राज्यात सायबर क्राईम गुन्ह्यात वाढ होत चालली असून काल एका भामट्याने वास्को येथील मरिन ऑफिसरला त्याचे विजेचे बिल भरायचे आहे असे सांगून 1 लाख 4 हजार रु. ना. गंडा घातला. सदर भामट्याने या अधिकाऱ्याला वीज बिल भरण्यासाठी एक रिमोट कंट्रोल ॲप डाऊनलोड करायला सांगितले. नंतर या भामट्याने रिमोटद्वारे त्याच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवून त्याच्या खात्यावरील पैसे आपल्या खात्यावर वळवले. यासंबंधी वास्को पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अन्य एका अशाच प्रकारच्या सायबर गुन्ह्यात दिल्लीस्थित एका भामट्याने वायंगिणी येथील एका इसमाला कैलास मानसरोवराच्या टुरच्या आयोजनाचे आमिष दाखवून त्याला 4 लाख 65 हजार रु.ना गंडा घातला. या प्रकरणातील आरोपीचे नाव दीपक कुमार असे आहे.