विजय केंकरेंच्या अध्यक्षतेखाली कृती दल समितीची स्थापना

0
5

>> 13 सदस्यीय समितीत कलाकार आणि अधिकाऱ्यांचा समावेश

>> कला अकादमीत सुधारणा आणि दर्जा वाढीसाठी करणार सूचना

कला अकादमीच्या कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या नूतनीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय कृती दल समितीची स्थापना काल करण्यात आली. कला अकादमीत सुधारणा आणि दर्जा वाढविण्यासाठी सूचना करण्याची जबाबदारी ह्या समितीकडे सोपविण्यात आली आहे.

गोवा कला अकादमीचे अंदाजे 70 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केल्यानंतर सुद्धा मुख्य सभागृहात अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. कला अकादमीचा विषय गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गाजला होता. कला अकादमीची ध्वनी यंत्रणा, विद्युत यंत्रणा आदींमध्ये त्रुटी असल्याचा तक्रारी आहेत.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीतील त्रुटींबाबत आढावा घेण्यासाठी कला क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्याची घोषणा केली होती.

गोवा कला राखण मंचने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या विषयावर चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कला अकादमीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती आठवठाअखेरपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, राज्य सरकारने कला अकादमीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीची घोषणा केली आहे.

समितीत कोणाचा समावेश?
या समितीमध्ये कला क्षेत्रातील विविध मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात तोमाझिन कार्दोज, विलियम फर्नांडिस, प्रवीण गावकर, सतीश गावस, देविदास आमोणकर, फ्रान्सिस कुएलो, चार्ल्स कोरिया फाउंडेशनचे प्रतिनिधी, मुख्य आर्किटेक्ट – गोवा सरकार, कला अकादमीचे सदस्य सचिव, कला व संस्कृती खात्याचे संचालक, ईएसजीच्या मृणाल वाळके, मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांचा समावेश आहे. या समितीवर नोडल अधिकारी म्हणून प्रसाद लोलयेकर (शिक्षण सचिव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.