29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

लॉकडाऊनमध्येही व्यवहार सुरळीत राहतील असे धोरण बनवा ः पंतप्रधान

>> व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची घेतली बैठक

 

लॉकडाऊन राहील आणि जीवनही सुरळीत सुरू राहील असे धोरण बनवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना काल केले. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. कोरोना दीर्घकाळासाठी आपल्यात राहणार असल्याचे समजूनच राज्यांनी धोरण ठरवावे असे सांगून दो गज दूरी हा आपल्या जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्यावे असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. दरम्यान, लॉकडाऊनबाबतचा निर्णय ३ मे नंतरच होणार असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

देशात लागू असलेल्या दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर ३ मे नंतरच्या नियोजनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, करोना साथीला सुरुवात झाली आणि आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी याची चांगली अंमलबजावणी केली त्याला जनतेनेदेखील साथ दिली. आपल्याला आता एका बाजूने कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरू करायचे आहेत. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार नव्हेत असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांत आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

————–

लॉकडाऊन वाढवण्याची

१० राज्यांची मागणी

ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशा १० राज्यांनी लॉकडाऊनच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. तेलंगण या राज्याने तर या पूर्वीच राज्यातील लॉकडाउन ७ मेपर्यंत वाढवला आहे.

———————

रुग्ण संख्या पोहोचली २७ हजारांवर

दरम्यान, २४ तासात देशभरात १३९६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे.

दरम्यान ३८१ रुग्णांना एका दिवसात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशातील १६ जिल्हे असे आहेत जिथे गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर ८५ जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, तसेच कोणत्याही धर्म किंवा पंथाला कोरोनाचे लेबल लावू नका. कोरोना कुणालाही होऊ शकतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो बरा होतो त्यामुळे कुठेही तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करू नका असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांकडे पाठवणार नाही ः मुख्यमंत्री

गेल्या पावसाळी अधिवेशनात गोवा विधानसभेत संमत करण्यात आलेले भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक हे अद्याप कायदा खात्याकडेच आहे व ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवणार नसल्याचा...