ला लिगाचा २०२०-२१ मोसम १२ सप्टेंबरपासून

0
189

 

आयोजकांनी जर विद्यमान मोसमातील सामने नियोजित वेळेत पूर्ण केले तर ला लिगाच्या पुढील २०२०-२१ मोसमाला १२ सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकत, असे लीगचे अध्यक्ष्य जेव्हियर तेबास यांनी स्पष्ट केले.

कोरोना महामारीमुळे ला लिगा स्पर्धा गेल्या मार्च महिन्यापासून स्थगित आहे. गेल्या शनिवार व रविवारला सरकारी मान्यता मिळाल्यानंतर आता रिअल बेतिस आणि सेविल्ला यांच्यातील लढतीत ला लिगा स्पर्धेस ११ जूनपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. तर १९ जुलैला लीगची सांगता होणार आहे. सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. तरीही वेळापत्रकाची अजून अधिकृतपणे पुष्टी होणे बाकी आहे. जर विद्यमान मोसमातील उर्वरित ११ फेर्‍यांचे सामने रद्द झाल्यास सर्व क्लबना मिळून एकत्रितपणे १.११ अब्ज युरो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, असे तेबास यांनी स्पष्ट केले.