राज्य, जिल्हास्तरीय सहकार विकास समित्यांची स्थापना

0
2

राज्य सरकारने एका आदेशाद्वारे राज्य आणि जिल्हास्तरीय सहकार विकास समित्यांची (एससीडीसी) स्थापना केली आहे. केंद्र सरकारने देशभरात सहकार चळवळ मजबूत करणे आणि तळागाळापर्यंत पोचविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची योग्य कार्यवाही करण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेच्या योग्य कार्यवाहीसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली एका आंतरमंत्रालय अंतर्गत समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारने राज्य व जिल्हा स्तरावर समित्यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. राज्य सहकार विकास समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर जिल्हा सहकार विकास समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी आणि सहकार क्षेत्रातील सोसायट्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.