राज्यात 24 तासांत नवे 48 कोरोनाबाधित

0
4

राज्यात चोवीस तासांत नवीन 48 कोरोनाबाधित आढळून आले असून, 3 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 608 एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 15.3 टक्के आहे. राज्यात कोरोना स्वॅबच्या चाचणीमध्ये घट झाली आहे. चोवीस तासांत आणखीन 312 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. राज्यातील नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. चोवीस तासांत 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.