राज्यात २४ तासांत १३० कोरोनाबाधित

0
9

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १३० कोरोनाबाधित आढळून आले असून, एका कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करावे लागले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९२३ एवढी झाली असून, कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १४.३० टक्के एवढे आहे.

राज्यात जून महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शंभरच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन ९०९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यातील १३० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसर्‍या बाजूने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. राज्यात चोवीस तासांत आणखी १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे आहे.