राज्यात शून्य कोरोनाबाधित

0
3

राज्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या अखेर शून्यावर काल आली. राज्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून राज्याच्या सुटका झाली आहे.
राज्यात गेल्या 9 ऑगस्ट रोजी नवीन एक कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर राज्यात नवीन कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. मागील दोन दिवसांपासून राज्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या एकावर आली होती. गेल्या चोवीस एक कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. राज्यात चोवीस तासांत नवीन 206 स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात नवीन एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही.