राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी आणखी दोन कोरोना बळींची नोंद झाली असून, नवीन ८५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५४ एवढी झाली असून, सक्रिय रुग्ण संख्या ७२९ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ११.०६ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ७६८ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही. चोवीस तासांत आणखी ८० जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे आहे.