राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार कायम

0
12

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आधीच्या दिवसाच्या तुलनेत काल किंचित वाढ झाली असून, नव्या ९७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. मागील २४ तासांत १०५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात ९७ रुग्ण सापडले. त्यापैकी एका रुग्णाला इस्पितळात दाखल करावे लागले. मागील २४ तासांत १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सक्रिय रुग्णसंख्या ५१७ एवढी झाली आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ टक्के एवढे आहे.