राज्यात कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण

0
178

>> मोतीडोंगर निर्बंधित क्षेत्र जाहीर

>> एकूण संख्या १२५१ वर

राज्यात काल नवीन ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ७२४ झाली आहे. तर, कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२५१ एवढी झाली असून त्यातील ५२४ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, मडगावमधील मोतीडोंगर परिसर निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात नवीन १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ झाली आहे. साखळीत चार ते पाच ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

मांगूर हिलमध्ये आत्तापर्यंत २६० रुग्ण
मांगूर हिलमध्ये नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मांगूर हिलमध्ये आत्तापर्यंत २६० रुग्ण आढळले आहेत. तर, मांगूर हिलशी संबंधित रुग्णांची संख्या २२२ एवढी जाहीर करण्यात आली आहे.

वेर्णात १ आयसोलेटेड
वेर्णा येथे नवीन १ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. काणकोण येथे नवीन १, चिंबल येथे आणखी १ तर इंदिरानगर चिंबल येथे ५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नवेवाडे येथे नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सडा येथे आणखी १ रुग्ण बायणात ४१ तर जुवारीनगरात २४ रुग्ण आढळले आहेत. मडगाव येथे नवीन ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून परराज्यातून आलेले ७ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

आरोग्य सचिवांची पत्रपरिषदच नाही
राज्याच्या आरोग्य सचिवांची २१ जूनपासून सलग नऊ दिवस दैनंदिन पत्रकार परिषद घेतलेली नाही.

मोदी आज देशाला संबोधित करणार
आज मंगळवार दि. ३० जून रोजी संध्याकाळी ४ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.