राज्यात चोवीस तासात आणखी एका कोरोना बळीची नोंद काल झाली असून नवीन ७३ बाधित आढळून आले आहेत. ४ बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सक्रिय रूग्ण संख्या ७४८ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३८४६ एवढी झाली आहे. चोवीस तासांत नवीन ७१४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १०.२२ टक्के एवढे आहे. राज्यात आणखी ९२ कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ एवढे आहे.