राज्यात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता

0
16

राज्यात चोवीस तासांत १.१५ इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने गुरुवार १४ आणि शुक्रवार १५ जुलै रोजी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्ती केली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यात आत्तापर्यत ६७.८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे आत्तापर्यत सर्वाधिक ८७.९४ इंच, पेडणे येथे ७५.२४ इंच, सांगे येथे ७४.८६ इंच पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात जोरदार पावसामुळे दोन वेळा पुराला तोंड द्यावे लागले आहे. चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक १.९६ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणेे येथे १.८० इंच, काणकोण येथे १.७१ इंच, मडगाव येथे १.०९ इंच, केपे येथे १.४४ इंच, सांगे येथे १.५ इंच, साखळी येथे १.२४ इंच, जुने गोवा येथे १.१८ इंच, ङ्गोंडा येथे १ इंच पावसाची नोंद झाली आहे.