राज्यातील सागरी पर्यटन हंगामास बुधवारपासून प्रारंभ

0
7

>> 1800 पर्यटकांना घेऊन पहिले देशी जहाज मुरगावात येणार

गोव्याच्या 2024-25 या वर्षाच्या सागरी पर्यटन हंगामाला बुधवार दि. 18 सप्टेंबर रोजी सुरूवात होत आहे. एमव्ही एम्प्रेस हे देशांतर्गत पर्यटक जहाज पर्यटक मुरगाव बंदरात मुंबईमार्गे बुधवारी 1800 पर्यटक व या जहाजावरील 600 कर्मचारी मिळून 2400 पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सेलेब्रीटी मिलेनियम हे या हंगामातील पहिले विदेशी पर्यटक जहाज मुंबईमार्गे 2034 पर्यटक व 850 जहाजावरील कर्मचारी मिळून 2884 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. 2024-25 या पर्यटन हंगामात एमव्ही या देशांतर्गत जहाजाच्या एकूण 30 फेऱ्या 14 जून 2025 पर्यंत असतील. यातून 61,020 पर्यटक तर या जहाजावरील 18 हजार कर्मचारी मिळून 79,020 देशी विदेशी पर्यटक दाखल होणार आहेत.

12 मे रोजी शेवटचे विदेशी जहाज येणार
2024-25 या सागरी पर्यटन हंगामातील शेवटचे विदेशी पर्यटक जहाज ‘सिल्वर व्हीस्पर’ सोमवार दि. 12 मे 2025 रोजी कोचीनमार्गे 435 पर्यटक व 305 जहाजावरील कर्मचारी मिळून 740 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मूरगाव बंदरात दाखल होणार आहे.

14 जूनला सांगता

या पर्यटन हंगामाची सांगता शनिवार दि. 14 जून 2025 रोजी एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत जहाजाद्वारे होणार आहे. तसेच 2024-25 या सागरी पर्यटन हंगामात देशांतर्गत तसेच विदेशी पर्यटक जहाजातून एकूण 89,309 देशी विदेशी पर्यटक गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार असल्याची माहिती जे. एम. बक्षी कंपनीचे सरव्यवस्थापक गोविंद पेनुर्लेकर यांनी दिली.

यंदा कमी जहाजे येणार
गेल्या सागरी पर्यटक हंगामाच्या तुलनेत यंदा देशांतर्गत जहाजाच्या 30 फेऱ्या गोव्यात असणार, गेल्या हंगामात 37 फेऱ्या होत्या. तर यंदा फक्त 10 विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात दाखल होणार आहे.गेल्या हंगामात 20 विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाली होती.

यंदा दहा विदेशी जहाजे राज्यात येणार

यंदा एकूण दहा विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून 12017 पर्यटक तर 5292 या जहाजातील कर्मचारी वर्ग मिळून 17309 देशी-विदेशी पर्यटक मुरगाव बंदरात गोव्याचा सौंदर्यसृष्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत. यात पहिले विदेशी सेलेब्रीटी मिलेनियम हे विदेशी पर्यटक जहाज 5 डिसेंबर 2024 रोजी कोचीनमार्गे मुरगाव बंदरात 2034 पर्यटक व या जहाजावरील 850 कर्मचारी मिळून 2884 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल होणार आहेत. तसेच या जहाजाची दुसरी फेरी रविवार दि. 8 डिसेंबर 2024 रोजी मुंबईमार्गे मुरगाव बंदरात होणार असून 2884 पर्यटक दाखल होणार आहेत. गुरुवार दि. 26 डिसेंबर 2024 रोजी मुंबई मार्गे मुरगाव बंदरात सेव्हन सीस व्होएजर हे विदेशी पर्यटक जहाज 700 पर्यटक व 420 कर्मचारी मिळून 1120 पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. या जहाजाच्या आगमनाने 2024-25 या सागरी पर्यटन हंगामाची पहील्या टप्प्याची सांगता होणार आहे.

दुसरा टप्पा 1 जानेवारीपासून

या पर्यटन हंगामाची दुसऱ्या टप्प्याची सुरुवात एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत जहाजाद्वारे गुरुवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. तर या दुसऱ्या टप्प्यात पहिले विदेशी पर्यटक जहाज गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी ‘सेलेब्रीटी मिलेनियम’ या जहाजाद्वारे होणार आहे. या पर्यटक जहाजातून पर्यटक व कर्मचारी मिळून 2884 देशी विदेशी पर्यटक मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. सदर जहाज मुंबईमार्गे गोव्यात दाखल होणार आहे. नंतर ते पर्यटकांना घेऊन कोलंबो येथे रवाना होणार आहे. शनिवार 1 मार्च 2025 रोजी न्यू मेंगलोर मार्गे ‘ब्रीडीयन स्काय’ हे विदेशी पर्यटक जहाज मुरगाव बंदरात 120 पर्यटक व 58 कर्मचारी मिळून 178 देशी विदेशी पर्यटक दाखल होणार आहे. शुक्रवार दि. 28 मार्च 2025 रोजी ‘अमादीया’ हे विदेशी पर्यटक जहाज कोचीनमार्गे मुरगाव बंदरात 650 पर्यटक व 250 कर्मचारी मिळून 900 देशी विदेशी पर्यटक घेऊन दाखल होणार आहे. रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी ‘नोर्वेजियन स्काय’ हे विदेशी पर्यटक जहाज न्यू मेंगलोरमार्गे गोव्यात मुरगाव बंदरात 3394 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. शुक्रवार दि. 2 मे 2025 रोजी नौटीका हे पर्यटक जहाज न्यू मेंगलोरमार्गे 830 पर्यटक व 375 कर्मचारी मिळून 1205 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. शनिवार दि. 10 मे रोजी ‘सेव्हन सीज’ हे विदेशी पर्यटक जहाज मूंबई मार्गे 700 पर्यटक व 420 कर्मचारी मिळून 1120 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मूरगाव बंदरात दाखल होणार आहे.