मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज (दि. 8) विधानसभेत दुपारी आर्थिक वर्ष 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारकडून स्वयंपूर्ण गोवावर भर दिला जात आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प स्वयंपूर्ण गोवाला चालना देणारा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होणे अपेक्षित आहे.