राज्यपालांविरोधात तामिळनाडूत निदर्शने

0
8

तामिळनाडूत राज्यपाल आर. एन. रवी यांच्याविरोधात अविरत निदर्शने सुरू आहेत. राज्यपालांनी विधानसभेत तामिळनाडूचे नाव ‘तमिझगम’ करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर मंगळवारी द्रमुक कार्यकर्त्यांनी चेन्नईच्या वल्लुवर कोट्टम व अन्ना सलाईमध्ये ‘गेट आउट रवी’चे पोस्टर्स लावले. शहराच्या अनेक भागंत द्रमुक कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.

राज्यपालांनी सोमवारी अभिभाषणाचा काही भाग सोडून दिला होता. हा भाग मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारने तयार केला होता. वगळलेल्या भागात सरकारच्या द्रविड मॉडलचा उल्लेख होता. तो वगळल्यानेही कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. दुसरीकडे, राजभवनाने पाठवलेल्या पोंगलच्या निमंत्रणावरूनही वाद सुरू झाला असून, त्यात आर. एन. रवी यांचा उल्लेख तमिझगमचे राज्यपाल असा करण्यात आला आहे.