29 C
Panjim
Friday, October 23, 2020

रंगभूमीचा नटसम्राट हरपला

>> डॉ. श्रीराम लागूंचे पुण्यात निधन, उद्या अंतिम संस्कार

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ व चतुरस्त्र अभिनेते, नटसम्राट श्रीराम लागू यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

अप्पासाहेब बेलवलकर यांची ‘नटसम्राट’ या वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटकातली त्यांची भूमिका विशेष गाजली. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा झाला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू हजर होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. तन्वीर हा त्यांचा मुलगा होता. त्याचे निधन झाल्यानंतर डॉ. लागू यांनी त्याच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता.

अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट हे नाटक त्यांच्यासाठीच लिहिले गेले होते. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.

त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विचारी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले. १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
नास्तिक विचार
डॉ. श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर ‘देवाला रिटायर करा’ नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते. ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.
अभिनय केलेले काही चित्रपट
अगर… इफ, अग्निपरीक्षा, अनकही, अरविंद देसाई की अजीब दास्तान, आखरी मुजरा, आज का ये घर, आतंक, आपली माणसं, आवाम, इक दिन अचानक, इनकार, इमॅक्युलेट कन्सेप्शन, इन्साफ़ का तराजू, ईमान धर्म, एक पल, औरत तेरी यही कहानी, करंट, कलाकार, कामचोर, काला धंदा गोरे लोग, काला बाज़ार, कॉलेज गर्ल, किताब, किनारा, किशन कन्हैया, खुद्दार, गुपचुप गुपचुप, चिमणराव गुंड्याभाऊ, जीवा, ज्वालामुखी, झाकोळ, पिंजरा, पुकार, प्रोफेसर प्यारेलाल, फूल खिले हैं गुलशन गुलशन, भिंगरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, सदमा, सामना, सिंहासन, सुगंधी कट्टा…

पुरस्कार
डॉ. लागू यांना १९७८ मध्ये फिल्म फेअर पुरस्कार लाभला होता. १९९७, कालिदास सन्मान, २००६ मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार, २०१०, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, २०१२, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार त्यांना लाभला.

अभिनित काही नाटके
अग्निपंख, आकाश पेलताना, आधे अधुरे (यात ४ भूमिका), इथे ओशाळला मृत्यू, उद्याचा संसार, उद्ध्वस्त धर्मशाळा, एकच प्याला, किरवंत, खून पहावा करून, गिधाडे, चंद्र आहे साक्षीला, चाणक्य विष्णुगुप्त, जगन्नाथाचा रथ, दूरचे दिवे, नटसम्राट, पप्पा सांगा कुणाचे, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, मुख्यमंत्री, लग्नाची बेडी, वेड्याचं घर उन्हात, सुंदर मी होणार, सूर्य पाहिलेला माणूस, हिमालयाची सावली, क्षितिजापर्यंत समुद्र… इ.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

यंदा इफ्फीचे आयोजन १५ जानेवारीपासून शक्य

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या १५ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे...