युक्रेनशी युद्धाची ही वेळ नाही

0
8

>> नरेंद्र मोदींचा व्लादिमीर पुतीन यांना सल्ला

उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये आयोजित शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांत जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. युद्धाने कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही. आपल्याला शांततेच्या मार्गाने पुढे जावे लागेल. तुम्ही समस्यांवर तोडगा शोधा. आज युक्रेनशी युद्ध करण्याची वेळ नाही, असा सल्ला मोदींनी पुतीन यांना दिला. सोबतच युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढता आल्याबद्दल त्यांनी रशिया व युक्रेनचे आभार मानले.