पंजाब राज्यातील मोहालीमधील पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयावर सोमवारी रॉकेटद्वारे ग्रेनेडचा हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना घटनास्थळी तीन मोबाईल टॉवरमधून सुमारे ७ हजार मोबाईल फोन आढळून आले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ही घटना घडल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस महासंचालकांशी बातचित करून घटनेचा आढावा घेतला. या स्फोटात दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाई, असे आश्वासन मान यांनी दिले आहे. या घटनेमुळे राज्याच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच सीमा सुरक्षा दलाने सीमेपलीकडून ड्रोनद्वारे होणार्या स्फोटके, शस्त्रे आणि ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश केला होता.