मोपवरील ब्ल्यू टॅक्सीसाठी 9 जूनपासून अर्ज स्वीकृती

0
6

गोमंतकीय टॅक्सीचालकांना मनोहर आंतरराष्ट्रीय विमानळावर ब्ल्यू टॅक्सी सुरू करता याव्यात यासाठी वाहतूक खाते त्यांच्याकडून येत्या 9 जून ते 15 जून या दरम्यान अर्ज स्वीकारण्ाार आहे. पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांनाच त्यासाठी अर्ज करता येईल. पीसीओपीए फॉर्म भरुन हे अर्ज सादर करावे लागणार असल्याचे वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे.

गोवा मोटर वाहन नियम 1991 नुसार पेडणे येथील सहाय्यक वाहतूक संचालकांच्या कार्यालयात हे अर्ज भरुन द्यावे लागणार आहेत. गेल्या 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक नोटिसीच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी अर्ज सादर केले होते, त्याच अर्जदारांकडून हे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज सादर करताना ज्यांच्याकडे टॅक्सी होती, त्यांनाच ब्ल्यू टॅक्सी सेवेसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे. या टॅक्सीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत 170 जणांनी अर्ज सादर केले होते.