>> १५० अज्ञातांविरोधांत गुन्हा
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी गृहमंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकार्यांना समन्स पाठवले आहे. समन्स बजावलेल्यांमध्ये पंजाबचे पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकार्यांचा समावेश आहे. या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहवाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्या हालचालींचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवार दि. १० जानेवारी रोजी होणार आहे.