मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच नव्या डीनच्या नियुक्तीला स्थगिती

0
8

>> आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे स्पष्टीकरण

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) म्हणून डॉ. जयप्रकाश तिवारी यांची जी नियुक्ती करण्यात आली होती, त्या नियुक्तीला आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करूनच स्थगिती दिली असल्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केले. डॉ. शिवानंद बांदेकर हेच आता गोमेकॉचे डीन म्हणून काम पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमवारी सायंकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळाच्या डीनपदी डॉ. जयप्रकाश तिवारी यांची नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता; मात्र अवघ्या काही तासांतच सोमवारी रात्री उशिरा या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती.