एडीआर या संस्थेने देशातील 30 मुख्यमंत्र्यांची त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मालमत्ता आणि गुन्ह्यांचे विश्लेषण केले आहे. मालमत्तेच्या बाबतीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे 12 व्या स्थानी असून, त्यांची मालमत्ता 9.37 कोटी रुपये एवढी आहे. तसेच, त्यांच्याविरोधात एकही गुन्हा नोंद नाही. मालमत्तेच्या बाबतीत आंध्रप्रदेश मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी हे प्रथम क्रमांकावर आहे. त्यांची मालमत्ता 510 कोटी रुपये एवढी आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचा क्रमांक लागत असून, त्यांची संपत्ती ही 163 कोटी रुपये इतकी आहे. सर्वात कमी मालमत्ता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची असून, त्यांच्याकडे केवळ 15 लाख रुपयांची संपत्ती आहे. देशातील 11 मुख्यमंत्र्यांची मालमत्ता 10 कोटींपेक्षा जास्त आहे, तर देशातील 13 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे नोंद आहेत.