मावजो यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त बोलू नये ः ढवळीकर

0
9

आम्हांला भाषेचे राजकारण करून पुढे जायचे नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान टाळले पाहिजे. मावजो यांनी मराठी भाषेवर बोलण्यापेक्षा कोकणी भाषेत साहित्य निर्मिती वाढविण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल व्यक्त केली.

मावजो यांना खूप मोठा असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनी मराठी – कोकणीवर बोलून वाद निर्माण करण्यापेक्षा कोकणी भाषेत साहित्य निर्मिती वाढवण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे. सरकारकडून कोकणी साहित्य निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य केले
जाईल.

मावजो यांनी मराठी भाषेच्या विषयावर बोलताना खूप विचार करून बोलले पाहिजे. पूर्वीच्या काळात मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे मावजो यांचे शिक्षण मराठी भाषेतून झाले असावे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
मावजो यांनी मराठीला राज्यभाषेचा भाग करू नये, असे विधान केल्याने त्यांचे विधान हे राज्यात वादाचा विषय बनला आहे.