महिला आयोगाचा अध्यक्ष एक महिन्यात निवडा; अन्यथा मोर्चा

0
12

>> आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांचा इशारा

गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षांची निवड एका महिन्यात करावी; अन्यथा महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्र्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीच्या महिला विभागाच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

प्रतिमा कुतिन्हो आणि आपच्या महिला विभाग उपाध्यक्ष सिसिल रॉड्रिग्स यांनी राज्यात महिलांच्या विरोधातील वाढत्या गैरप्रकारांच्या प्रकरणांबाबत चिंता व्यक्त केली. गोवा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. महिला व बालकल्याण खात्याने येत्या महिनाभरात म्हणजेच ३० जूनपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करावी. अध्यक्षपद रिक्त असल्याने आयोगाचे कामकाज ठप्प झाले आहे, असेही कुतिन्हो यांनी सांगितले.