मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्यांसह २२ कॉंग्रेस आमदारांनी राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. आज गुरूवारी या सरकारची बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मध्य प्रदेशातील २१ बंडखोर कॉंग्रेस आमदार सध्या रामदा हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह या हॉटेलवर पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे दिग्विजय सिंह यांनी हॉटेलबाहेरच ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले.