मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव नगरपालिकेला एकल निवासस्थानांना बांधकाम परवाने देण्याची परवानगी काल दिली. न्यायालयाने सोनसडो येथील कचरा विल्हेवाट प्रश्नावरून मडगाव नगरपालिकेला नव्या बांधकामांसाठी परवाने देण्यावर निर्बंध घातले होते. सोनसडो कचरा प्रक्रिया स्थळावरील कचरा हाताळण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची दखल घेत उच्च न्यायालयाने आता मडगाव नगरपालिकेला एकल निवासी बांधकामांना म्हणजेच वैयक्तिक घरांना बांधकाम परवाने देण्याची परवानगी दिली, अशी माहिती एजी देविदास पांगम यांनी दिली. परवान्यांचे नूतनीकरण करण्यासही परवानगी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. मात्र, बहुमजली इमारतींना बांधकाम परवाने देण्याची परवानगी दिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.