मंत्री सिक्वेरांचा राजीनामा घ्या, वीरेश बोरकर यांची मागणी

0
10

माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यानंतर आता आरजीपीचे सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर आणि आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी कायदा व पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या नागरिकत्वप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण करण्याची मागणी काल केली. देशात कायदा सर्वांसाठी समान आहे. पोतुगालमध्ये जन्म नोंदणी असलेल्या व्यक्तीचे भारतीय पासपोर्ट रद्द केले जात आहेत. मंत्री सिक्सेरा यांच्या जन्माची नोंद पोर्तुगालमध्ये झालेली आहे. त्यामुळे आलेक्स सिक्वेरा मंत्री आणि आमदारपद भूषवू शकत नाहीत, असे ॲड. पालेकर यांनी सांगितले. मंत्री सिक्वेरा यांच्या नागरिकांच्या मुद्द्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. ओसीआयचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केलेला मंत्री, आमदारपदी राहू शकत नाही. भाजपने या प्रकरणी त्वरित कृती करून मंत्री सिक्वेरा यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली.