मंत्रिमंडळ फेररचनेचा निर्णय मुख्यमंत्री घेणार ः तानावडे

0
12

राज्य मंत्रिमंडळाची फेररचना करायची की काय याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असून तो त्यांचा अधिकार आहे. ते त्याबाबत जो काही निर्णय घेतील त्याला पक्ष पाठिंबा देणार असल्याचे काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळाची लवकरच पुनर्रचना होणार असल्याची सध्या चर्चा असून या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काल पत्रकारांनी तानावडे यांना त्यासंबंधी छेडले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
राज्य मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला डच्चू देणे व त्याच्या जागी नव्या आमदाराला मंत्री बनवणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असे तानावडे म्हणाले. लोकसभा निवडणुकानंतर राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तानावडे यांना प्रश्न विचारला होता.
मुख्यमंत्र्यांना तर मंत्रिमंडळात फेररचना करायची असेल तर ते त्याबाबत पक्षाला कळवतील असे सांगून आम्ही त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.