भाजपच्या मंत्र्यांकडून कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग ः कॉंग्रेस

0
123

 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो अन्य काही मंत्री कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन तत्वांचा अवलंब करत नसल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला.

काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री राणे, मंत्री लोबो हे जेव्हा मंत्रालयातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. तसेच सरकारी गाडीतून जाताना त्यांनी सामाजिक अंतर पाळले नाही असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकातून म्हटले आहे.

लोकांना याचा पुरावा हवा असल्यास त्यांनी समाजमाध्यमावरील ह्या मंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीनंतरचे फोटो पहावेत असे पणजीकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री तसेच त्यांचे मंत्रिगण हे आपल्यावरील कृतीद्वारे त्यांच्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचे पणजीकर यांनी म्हटले असून या विरोधात सर्व मंत्र्यांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणीही पणजीकर यांनी केली आहे.