बारावीची पुरवणी परीक्षा 2 जूनपासून

0
6

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा साधारणपणे येत्या 2 जूनपासून घेण्यात येणार आहे, तर प्रात्यक्षिक परीक्षा 14 जूनपासून घेतली जाणार आहे. ही पुरवणी परीक्षा म्हापसा येथील कुशे उच्च माध्यमिक विद्यालय आणि नुवे-मडगाव येथील कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालय अशा दोन केंद्रातून घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी येत्या 22 मेपर्यंत वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जात आहेत. बारावीची परीक्षा अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, आपली गुणांची टक्केवारी वाढविण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसू शकतात, असे कळविण्यात आले आहे.