बाबूश समर्थक उमेदवार महायुतीला समर्थन देणार

0
138

उत्तर गोवा जिल्हा पंचायत
जिल्हा पंचायतीसाठी उत्तर गोव्यात भाजप-मगो युतीचे अकरा सदस्य असले तरी आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी आपले दोन सदस्य देण्याची तयारी दर्शविल्याने उत्तर गोवा जिल्हा पंचायत महायुतीच्या ताब्यात ठेवण्यात कोणतीही अडचण नाही, असे पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले. भाजप-मगो, युतीला अनेक अपक्षांचा पाठिंबा मिळेल, त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही, असे मांद्रेकर म्हणाले. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद महिलेसाठी राखीव ठेवले आहे. पुढील दोन दिवसांत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीच्या नावाची निवड होऊ शकेल. दक्षिण गोव्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.