बलुचिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू

0
6

पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथील ग्वादरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये चार चिनी नागरिकांसह पाकिस्तानी लष्कराच्या नऊ जवानांचाही समावेश आहे. हा हल्ला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर करण्यात आला. येथील ग्वादरमध्ये चिनी कामगारांवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) आत्मघाती संघटना मजीद ब्रिगेडने स्वीकारली आहे.

बीएलएने त्यांच्या दोन मजीद ब्रिगेड ‘फिदाईन’ने हल्ल्यात भाग घेतला होता असा दावा केला आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दोन कथित हल्लेखोरांची छायाचित्रे जारी केली आहेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. बंदर शहर ग्वादरमध्ये स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला.