बंगळुरुत 5 लाखांचे गोवा बनावटीचे अवैध मद्य जप्त

0
4

बंगळुरू उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून कर्नाटकात होणाऱ्या मद्य तस्करीचे आणखी एक प्रकरण उजेडात आणले असून या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून पाच लाख रुपयांचे मद्य जप्त केले आहे. या प्रकरणात अटक केलेली व्यक्ती गोव्यातील एका दुकानदाराकडून मद्य घेत होती. तसेच, गोव्यातून बंगळुरूला बसगाड्यांतून मद्य पाठविले जात होते, असे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी कथरेगुप्पा येथील पुरुषोत्तम नामक व्यक्तीला अटक केली आहे.