बंगला विक्रीच्या बहाण्याने पाच कोटींची फसवणूक

0
7

चोपडे आगरवाडा येथील बंगला विक्रीच्या बहाण्याने सुमारे पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली आहे. ही घटना काल रविवारी २६ रोजी घडली. आगरवाडा येथील बंगल्याची विक्री करत असताना सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पेडणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

याबाबत पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २५ रोजी दिल्ली येथील आशिष सिंग, डायरेक्टर ऑफ मनसिटी प्रमोटर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पेडणे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार राहुल शर्मा दिल्ली, विशाल गर्ग उत्तर प्रदेश, हरिष अरोरा व अभिनव चंदला या चौघांना अटक केली.

संशयितांनी ज्या कंपनीशी करार केला होता त्यांना बंगला देण्यास विलंब लावला. शिवाय ते पैसे देण्यासही टाळाटाळ करत असल्याने तक्रारदाराने थेट पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार पेडणे पोलिसांनी तपास करून संशयितांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर करत आहेत.