पोलीस उपअधीक्षकांच्या 28 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

0
19

गोवा लोकसेवा आयोगाने पोलीस खात्यातील पोलीस उपअधीक्षकांची 28 पदे थेट भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या एकूण 28 जागांपैकी 14 जागा अनारक्षित आहेत, तर 8 जागा ओबीसी, 4 जागा एसटी आणि 2 जागा ईडब्लूएससाठी राखीव आहेत. पोलीस उपअधीक्षकपदासाठी येत्या 8 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. अर्जदाराचे वय 30 पेक्षा जास्त असता कामा नये. तसेच, अर्जदार पदवीधर असला पाहिजे. या जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने प्री स्क्रिनिंग टेस्ट घेतली जाणार आहे, असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.