पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता काल देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीतून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले. सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. सतराव्या हप्त्याअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.
देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. देशाला तेलबिया आणि कडधान्यात आत्मनिर्भर करायचे आहे. तसेच शेतमालाच्या निर्यातीत देशाला अग्रणी बनवायचे आहे. आपले स्वप्न आहे की, जगातील प्रत्येक देशात भारतातील खाद्यान्न पोहोचले पाहिजे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.