पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू

0
15

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होणार असून, ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे, अशी माहिती गोवा विधानसभा प्रशासनाने काल दिली. या अधिवेशनासंबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली. ह्या अधिवेशनाचे कामकाज 18 दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या काळात 22, 23, 29 आणि 30 जुलै, तसेच 6 ऑगस्ट अशा पाच सुट्ट्या असतील. अधिवेशनासाठी आमदारांकडून तारांकित व अतारांकित प्रश्न मागवण्यात आले आहेत.