गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष, गोमंतकीय साहित्यिक ऍड. पांडुरंग नागवेकर यांचे वळवई येथील निवासस्थानी काल सकाळी निधन झाले.
ऍड. नागवेकर गेले काही महिने आजारी होते. नागवेकर हे व्यवसायाने वकील असले तरी मराठी भाषेचे जाज्वल्य अभिमानी होते. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या चळवळीत हिरीरिने सहभाग घेतला.
गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यात त्यांचे बरेच योगदान आहे. स्व. शशिकांत नार्वेकर यांच्या कार्यकाळात ऍड. नागवेकर यांनी अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले होते. गोवा साहित्य सेवक मंडळाचे सदस्य होते. ऍड. नागवेकर यांनी गोव्याच्या इतिहासावर सातत्याने लिखाण केले. मयेवासीयांना जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. वळवई ललितप्रभा नाट्यमंडळाच्या कार्यात योगदान दिले. त्यांच्या प़श्चात पत्नी, मुलगा, विवाहित कन्या असा परिवार आहे.