पणजीत पुन्हा विक्रमी कमाल तापमानाची नोंद

0
9

पणजी शहरात काल पुन्हा एकदा विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली. गुरुवारी पणजीत विक्रमी 38.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा 6.1 अंश सेल्सिअस एवढे जास्त होते. तसेच, हे तापमान मागील 10 वर्षातील दुसरे उच्चांकी तापमान आहे.

यापूर्वी 6 मार्च 2013 रोजी पणजीमध्ये 38.7 अंश सेल्सिअस अशा विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती येथील हवामान विभागाने दिली.
येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात गत सोमवारी उच्चांकी 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.