पंजाब नॅशनल बँकेला 16.42 लाखांचा गंडा

0
5

पंजाब नॅशनल बँकेला एका व्यक्तीने आपण एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून तब्बल 16.42 लाखांचा गंडा घालण्याची घटना घडली या प्रकरणी बँकेने पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्षाकडे गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.
सदर भामट्याने आपण एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून पंजाब नॅशनल बँकेच्या पाजीफोंड-मडगाव येथील कर्मचाऱ्याला फसवले. या भामट्याने या बँकेत आपले खाते असून त्यातील रक्कम दुसऱ्या बँकेत आरटीजीएसने ट्रान्स्फर करायची आहे, असे सांगितले. बँक कर्मचाऱ्याने त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने संशयिताने सांगितल्याप्रमाणे दिलेल्या दुसऱ्या बँकेच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली. काही दिवसानी या बँकेच्या शाखेत काही रकमेच्या हिशेबात तफावत आणली तेव्हा तेथील व्यवहाराची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.