पंजाबमध्ये चौघांचा खून; फरार दोघांना गोव्यात अटक

0
25

पंजाबमधील चार जणांची हत्या करून फरार झालेल्या समलवाल गुरुनान सिंग (22, रा. अमृतसर) आणि अमृत केवल सिंग (22, रा. मियानविंड) यांना अमृतसरच्या विशेष पोलीस पथकाने गोवा गुन्हे शाखेच्या मदतीने झुआरीनगर-सांकवाळ येथून काल अटक केली. दोघेही झुआरीनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.
हे दोन्ही गुन्हेगार पंजाबमध्ये 4 जणांचा खून करून फरार झाले होते. गुन्हे दाखल केल्यानंतर ते तेथून गायब झाले होते. ते गोव्यात लपल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाल्यानंतर गोवा पोलिसांशी संपर्क साधला. दोघेही सांकवाळ येथील झुआरीनगर भागात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना पकडण्याची मोहीम पंजाब पोलिसांच्या मदतीने फत्ते करण्यात आली.