नोरोन्हांकडून फुटिरांविरुद्ध हायकोर्टात याचिका

0
5

सप्टेंबर 2022 साली काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्यात यावे, या मागणीसाठी डॉम्निक नोरोन्हा यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली. डॉम्निक नोरोन्हा यांनी यासंबंधी सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर दाखल केलेली अपात्रता याचिका त्यांनी काही दिवसांपूर्वीच फेटाळून लावली होती. या पार्श्वभूमीवर त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नोरोन्हा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले 8 आमदार म्हणजेच मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व रुदाल्फ फर्नांडिस हे घटनेतील 10 व्या परिशिष्टानुसार अपात्र ठरायला हवेत. 8 आमदारांचे पक्षांतर वैध ठरवण्यासाठी मूळ पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नसल्याचे डॉम्निक नोरोन्हा काल म्हणाले.